प्रदूषण
प्रदूषण अनेक प्रकारचे
असते. यामध्ये मृदा प्रदूषण,
जलप्रदूषण, वायू प्रदूषण
इत्यादींचा समावेश होतो. प्रदूषण टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावणे गरजेचे
आहे.वातावरणात पाण्यात, हवेत किंवा अन्नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या
क्रियेला प्रदूषण
म्हणतात.
प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील
अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळणे. उदाहरणार्थ, हवेमध्ये डीझेल या इंधनातून सल्फर असलेला धूर वातावरणात
मिसळतो. यामुळे वातावरणात अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी पोहचून
सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर नको असताना पोहचतात. यामुळे
पर्यावरणाचा र्हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. परिणामतःजागतिक तापमान increased,
global Warmin,उष्माघात, त्वचेचा कर्करोग या सारखे धोके निर्माण होतात.
प्रदूषणाची काही महत्त्वाची उदाहरणे : -
·
जल / पाणी प्रदूषण:—
अशुद्ध पाणी म्हणजे पाणी प्रदूषण, विवध कारखान्याचे
रसायने मिसळेले पाणी तलाव, नदी इत्यादी मध्ये सोडले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषण होते.
कारखान्यातून मोठ्या प्रमाणात निघणारा
धूर हवेत सोडला जातो, तसेच वाहनामधून निघणारा धूर हवेत मिसळून हवेचे प्रदूषण होते.
·
ध्वनिप्रदूषण:— आवाज म्हणजे ध्वनिप्रदूषण
वाहनांचा ,कारखान्यातील यंत्र , वाहनाचा मोठा कर्कश आवाज तसेच गाण्यांचा मोठा
आवाज या मुळे ध्वनी प्रदूषण होते.
·
मृदा प्रदुषण - मृदा म्हणजे मातीचे
प्रदुषण
·
सध्या पाणी प्रदूषण
हा एक गंभीर प्रश्न समाजासमोर आहे आणि त्यापेक्षा गंभीर परिस्थिती हि सांडपाणी
व्यवस्थापनाची आहे.
·
हवा प्रदूषण हे
प्रामुख्याने कारखान्यांमधून निघणारा धूर तसेच गाड्यांमधून निघणारा धूर यांमुळे
होते.
आता
आपण प्रदुषणाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत .
जलप्रदूषण
जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या
स्रोतांचे प्रदूषण. जलप्रदूषण ही एक मानव निर्मित समस्या आहे.
जल(पाणी) हे माणसाच्या मूलभूत
गरजांपैकी एक आहे
जल प्रदूषणाची कारणे -
·
औद्योगिक वसाहती व
कारखान्यांतील रासायनिक पदार्थ कोणत्याही प्रक्रियेविना नदी/नाले व इतर
जलस्रोतांमध्ये सोडले जातात.
·
नदीत कपडे धुणे, भांडी घासणे यामुळे
·
रासायनिक प्रक्रिया
केलेले पाणी पाण्यात मिसळल्याने पाण्यातील मासे मृत पावल्याने पाणी मोठ्या
प्रमाणात प्रदूषण होते.
जलप्रदूषण आणि आरोग्य
पाण्यातून होणाऱ्या संसर्गामुळे
मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेषतः पाच वर्षांच्या आतील मुले
अशा संसर्गाला बळी पडतात. जगण्यासाठी सजीवांना पाण्याची अत्यंत गरज असते. जगात
उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी फक्त १ ते १.५ % पाणीच पिण्यायोग्य आहे. कारण
पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी जवळजवळ ९८ % पाणी हे समुद्र आणि बर्फाच्या
स्वरूपात आहे. त्यामुळे पिण्यायोग्य पाणी जपून वापरणे गरजेचे तर आहेच आणि
पिण्यायोग्य पाण्यात प्रदूषके मिसळण्यापासून थांबवणेसुद्धा गरजेचे आहे. जलप्रदूषण
हे आपल्यासाठी खूप हानिकारक आहे.
जलप्रदुषणाची सामान्य कारणे – कचरा व सभान() याचे
वापर करणे
अनेक कारणांद्वारे जलप्रदूषण होत असते
● औद्योगिक रासायनिक पदार्थ पाण्यात सोडण्याने
● सांडपाणी मैलापाणी जलाशयात सोडल्याने,
● पाण्यातील जीव मृत होऊन कुजल्याने,
● कचरा किंवा तत्सम पदार्थ पाण्यात टाकल्याने,
● जनावरे, कपडे, भांडी नदीच्या ठिकाणी धुतल्याने, मृत जनावरे नदीत टाकल्याने,
● रासायनिक रंगकाम केलेल्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या
मूर्तींच्या विसर्जनामुळे पाण्याचे प्रदूषण होते.
● जलप्रदूषणामुळे पाण्यामध्ये जीवाणूंची उत्पत्ती होते असे
जीवाणूयुक्त पाणी पिल्याने अनेक रोग उत्पन्न होतात. यामध्ये अतिसार (हगवण), उलटी,कावीळ, विविध प्रकारचे ताप, पटकी, मलेरिया, खोकला, सर्दी यांसरखे
विकार होतात.
● रासायनिक पदार्थयुक्त पाणी सेवन केल्यास त्यांचा अत्यंत वाईट
परिणाम आपल्या किडन्यांवर होतो. किडन्या निकामी होणे यासारखे गंभीर व्याधी उत्पन्न
होतात.
जगभरातील साधारण २५ टक्के लोकसंख्येला पिण्याचे शुद्ध पाणी मिळू शकत नाही. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीनचा वापर सर्वाधिक केला जातो. पण त्यामुळे पाण्यातील सर्व प्रकारचे जंतू मरत नाहीत.त्यामुळे पाणी शुद्धीकरणासाठी शुद्धीकरणाच्या अन्य पद्धतींची गरज पडते.
जलप्रदूषण थांबवणे
यासाठी
● औद्योगिक
घटकांना मार्गदर्शक सूचना करणे, रासायनिक
पदार्थ पाण्यात टाकण्यापासून अटकाव करणे.
● सेंद्रिय शेतीचा वापर करणे. रासायनिक खते, कीटकनाशके मर्यादित
प्रमाणात वापरणे.
● पाणी उकळवून आणि त्यामध्ये तुरटी फिरवून पाणी पिणे.
● कारखान्याचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे.
● अशुद्ध पाण्याची निर्मिती कमीतकमी प्रमाणात कशी होईल याची काळजी
घेणे.
● घरगुती अशुद्ध पाणी योग्य ती प्रक्रिया करूनच नदीमध्ये सोडणे.
वायूप्रदूषण
प्रदूषक घटके
नैसर्गिक हवेतील जे पदार्थ अथवा घटक
मानवी, प्राणी, पक्षी, वनस्पती, उपयुक्त जंतू यांच्या आरोग्यास व जीवनास हानिकारक आहेत, तसेच जे हवामान
बदलास कारणीभूत आहेत त्यांना प्रदूषक घटक असे म्हणतात.
·
सल्फर डायॉक्साईड (SO2)- सफ्लर डायॉक्साईड जेव्हा श्वसनावाटे नाकपुड्यांमध्ये जातो तेव्हा
श्वसननलिकेतील पेशी सल्फर डायॉक्साईडला फुफ्फुसापासून पोहोचण्यापूर्वी कफातील
पाण्यात विरून टाकतात. जर याचे प्रमाण जास्त झाले तर नलिकेत अजून जास्ती कफ होतो व
सर्दी होते.
·
नायट्रोजन ऑक्साईड
व डायॉक्साईड (NO and NO2) नायट्रोजन
डायॉक्साईड सुद्धा सल्फर डायॉक्साईड प्रमाणे श्वसननलिकेत प्रवेश करतो परंतु याची
पाण्यात विरण्याची क्षमता कमी असते व तो बराचसा फुफ्फुसापर्यंत पोहोचतो. यामुळे
जास्तीत जास्त कफनिर्मिती होऊन सर्दी होते. इतर लक्षणांमध्ये त्वचा कोरडी पडणे, डोळे चुरचुरणे असे
प्रकार घडतात. वाहतुकीच्या वर्दळीमध्ये नायट्रोजन डायॉक्साईडमुळेच सर्दी वाढण्याचे
प्रकार घडतात. दीर्घकालानंतर सातत्याच्या सर्दीमुळे दमा, ताप हे नेहेमीचे
आजार बनून जातात.
·
ओझोन (O3)-ओझोनच्या सातत्याच्या मार्यामुळे कालांतराने फुफ्फुसे दुर्बल होऊन
दम्यासारखे रोग वाढीस लागतात. या अगोदर नमूद केलेल्या नायट्रोजन ऑक्साईडची
ऑक्सिजनशी रासायनिक क्रिया होऊन ओझोन तयार होतो, तसेच ओझोनचेही नायट्रोजन बरोबर
रासायनिक प्रक्रिया होऊन नायट्रोजन ऑक्साईड बनते. दिवसभर हवेत ओझोन व नायट्रोजन
ऑक्साईडचा कमी जास्त होण्याचा खेळ चाललेला असतो.
·
व्होलेटाईल ऑरगॅनिक
कंपाऊंड (VOC)- विविध रसायने व रासायनिक
उत्पादने यांच्या वापराने या उत्पादनांचे बाष्पीकरण होते व व्हीओसी. तयार होतात.
यातील काही घटक हे मानवी आरोग्यास सरळपणे घातक असतात तर काही सुरक्षितपण असतात.
बहुतांशी व्हीओसींचे सूर्यप्रकाशात ओझोनमध्ये रूपांतर होऊन जाते व ओझोन अंततः घातक
प्रदूषक घटकाचे काम करतो. पेट्रोलपंपावरील गाडी भरताना उडणारे पेट्रोल, घराला रंग देताना
थिनर व ऑईलपेंटचा वापर इत्यादी गोष्टी वातावरणातील व्हीओसी वाढवतात.
·
कार्बन मोनॉक्साईड(CO) - आरोग्यास अत्यंत
घातक असा हा वायू अपूर्ण ज्वलनाने तयार होतो. वीटभट्या, छोटे छोटे तसेच
मध्यम व मोठे वीजनिर्मितीसंच,
वाहनांचीया इंजिने यांमधून हा बाहेर
पडतो. आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहण्याचे काम करणारे हिमोग्लोबिनमध्ये
ऑक्सिजनऐवजी मिसळून जातो व शरीरातील सर्व भागात पोहोचतो. त्यामुळे हा वायु अत्यंत
विषारी असून काही मिनिटे सातत्याने संपर्कात आल्यास मृत्यूही ओढवू शकतो. हे
अतिटोकाच्या परिस्थितीत होऊ शकते,
परंतु कमी संपर्कात किंवा हवेतील कमी
प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड असल्यास चक्कर येणे, डोके दुखणे, विचारक्षमता अथवा
कार्यक्षमता कमी होणे असे प्रकार घडतात.
परिणाम
आरोग्यावरील परिणाम
वायुप्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम
श्वसनसंस्थेवर होतात. वर नमूद केल्याप्रमाणे विविध प्रदूषक घटके श्वसनव्यस्थेवर
हल्ला चढवतात. ओझोन, नायट्रोजन डायॉक्साईड हे फुफ्फुसांवर अतिशय घातक परिणाम करतात.
ओझोन फुफ्फुसांमधील पेशींना नष्ट करून फुफ्फुसे कमजोर करतो, त्यामुळे दमा वाढीस
लागतो. नायट्रोजन ऑक्साईड हे श्वसन नलिकेत व फुफ्फुसांत गेल्यानंतर फुफ्फुसे व
श्वसन नलिका ते विरघळवण्यासाठी जास्तीजास्त कफाची निर्मिती करतात व त्यामुळे आपणास
सर्दी होते. ही सर्दी अनेक दिवसांची जुनी झाल्यास जीवाणूंचा संसर्ग होतो व
परिस्थिती गंभीर होते. कार्बन मोनॉक्साईड आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहण्याचे काम
करणारे हिमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजनऐवजी मिसळून जातो व शरीरातील सर्व भागात पोहोचतो.
हा वायू अत्यंत विषारी असून काही मिनिटे सातत्याने संपर्कात आल्यास मृत्यूही ओढवू
शकतो.
निसर्गातील इतर घटकांवर परिणाम
केवळ मनुष्यच नव्हे तर निसर्गातील इतर
घटकांवर प्रदूषणाचे विपरीत परिणाम होतात. सल्फर डायॉक्साईड व नायट्रोजन
डायॉक्साईडमुळे अम्लधर्मी पावसाची निर्मिती होते व त्याचे विपरीत परिणाम जमीनीवर व
पिकांवर होतो. तंबाखूची पाने प्रदूषणाने खराब होतात असे निदर्शनात आले आहे.
इतर परिणाम
·
रबर ओझोनच्या
संपर्कात आल्यामुळे ते कडक बनते व त्याचे आयुष्य कमी होते. तसेच ओझोनच्या
अस्तित्वाने कपड्यांचे रंगही/ गाड्यांचे रंगही फिके होतात.
·
ताजमहाल, ग्रीसमधील
अक्रोपोलिस या व जगातील इतर महत्त्वाच्या वास्तूंचे सौंदर्यदेखील वायूप्रदूषणामुळे
कमी झाले आहे.
·
साध्या बांधकामाचे
आयुष्य कमी होते.
उपाय योजना
वायू प्रदूषणात प्रदूषके एकाच जागी
तयार होतात केंद्रीय उत्सर्जन (Point sources) अथवा सर्वत्र
थोड्या थोड्या प्रमाणात सार्वत्रिक उत्सर्जन(Diffused
sources) तयार होतात. केंद्रीय उत्सर्जन होण्याचे उदाहरण म्हणजे औद्योगिक
ठिकाणे, वीजनिर्मिती कारखाने, तर सार्वत्रिक उत्सर्जनाचे उदाहरण
आपली वाहतूक व्यवस्था धरता येईल. जर प्रदूषण एकाच जागी होत असेल तर त्यावर
नियंत्रण मिळवणे सोपे असते परंतु सर्वत्र थोड्या थोड्या प्रमाणात होणार्या
सार्वत्रिक उत्सर्जन प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे हे खूपच अवघड आहे. विविध प्रकारचे
कडक नियम व कायदे यांनी औद्योगिक क्षेत्रातून होणार्या प्रदूषणावर विकसित देशात
बर्याच प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. परंतु भारत व इतर विकसनशील देशात अजूनही
म्हणावी इतके यश मिळालेले नाही. कायद्याची कडक अंमलबजावणी मधील त्रुटी, तंत्रज्ञान
वापरण्याबद्दल असलेली आर्थिक उदासीनता (तंत्रज्ञान महाग पडते म्हणून न वापरणे) व
माहितीचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत. सार्वत्रिक उत्सर्जनाच्या प्रदूषणावर तंत्रज्ञानातील सुधारणा व
ऊर्जेचा कमी वापर यातूनच सुधारणा करता येते. सध्याचा विकसनशील देशांची वाढती
अर्थव्यवस्था व ऊर्जेचा वाढता वापर तसेच विकसित देशातील दरडोई असलेला मोठ्या
प्रमाणावरील वापर यामुळे ऊर्जेचा वापर कमी होणे सध्यातरी अशक्य दिसत आहे. त्यामुळे
तंत्रज्ञानातील सुधारणा किंवा प्रदूषणरहित नवीन व स्वस्त ऊर्जास्रोताचा शोध यावर
अवलंबून रहाणे आवश्यक आहे.
वाहनांमध्ये तंत्रज्ञान सुधारण्यास
मोठा वाव आहे. विविध प्रकारचे कॅटॅलिटिक कन्व्हहर्टर, फिल्टर यांच्या
वापराने वाहनातून बाहेर पडणार्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येते. वाहन रचनेत
सध्या होणार्या आमूलाग्र बदलांमुळे, वाहनातून बाहेर पडणार्या
प्रदूषकांमध्ये भविष्यात मोठ्या प्रमाणावर सुधारणा दिसून येईल. परंतु कोणत्या
प्रकारच्या ऊर्जास्रोताने जागतिक तापमान वाढ रोखता येईल, यावर अजूनतरी
समाधानकारक उत्तर सापडलेले नाही.
ध्वनिप्रदूषण
ध्वनिप्रदूषण' म्हणजे प्राणी, मनुष्य, यंत्र यांच्यामुळे
वातावरणात निर्माण झालेल्या व इतर मनुष्य किंवा प्राणी यांना बाधा पोचविणाऱ्या
आवाजामुळे निर्माण झालेली स्थिती.
==
ध्वनिप्रदूषणाचे मुख्य स्रोत==
1.
परिवहन प्रणाली
2.
चालू असताना आवाज
करणारी यंत्रसामग्री, वाहने वगैरे.
3.
लोकांचा गोंगाट
या व्यतिरिक्त गाड्यांचे हॉर्न, सायरन, फटाके, गिरण्यांचे भोंगे, ध्वनिवर्धकांचे
आवाज, रेडिओ-दूरचित्रवाणी संचांतून बाहेर पडलेले आवाज या सर्व गोष्टी
ध्वनिप्रदूषण वाढण्यास मदत करतात. विविध मिडीया मुळे आवाजा चा गोंगाटा वाढला आहे
आणि त्याचा विपरित पिरीणाम दिसून येतो.
ध्वनिप्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम
ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक आणि शारीरिक
स्वास्थ्य या दोघांवर परिणाम होतो. ध्वनिप्रदूषणामुळे शारीरिक व मानसिक ताण वाढतो, मनुष्य चिडचिडा आणि
आक्रमक होतो. त्याला झोप लागत नाही म्हणून त्याचे मानसिक संतुलन बिघडते व माणूस वेडापिसा होतो.
ध्वनिप्रदूषणामुळे रक्तदाब वाढतो व हृदयरोगाला आमंत्रण मिळते. कारखान्यांत मोठ्या
आवाजाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना म्हातारपणी बहिरेपणा येतो, म्हणजेच
ध्वनिप्रदूषणामुळे हळूहळू बहिरेपणा येतो. हृदयरोग असलेली व्यक्ती मोठमोठ्या
ध्वनिवर्धकाच्या आवाजाने दगावण्याची शक्यता असते. गर्भवती स्त्रीच्या गर्भालाही
ध्वनिप्रदूषणामुळे हानी पोहचू शकते. सणासुदी मध्ये स्पिकरच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात
ध्वनी प्रदूषण होते.
विमानतळाजवळ असलेल्या घरांच्या
भिंतींना विमानाच्या आवाजाने तडे पडतात. ध्वनिप्रदूषणाचा जनावरांवरसुद्धा हानिकारक
प्रभाव पडतो. सैन्याच्या पाणबुडीत वापरल्या जाणाऱ्या सोनार (sonar) या ध्वनिलहरींमुळे
वेल ह्या प्रजातीच्या काही जातींचे मासे मृत्युमुखी पडतात
ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण), नियम,
२०००
वाहनांची वाढती संख्या, औद्योगिकीकरण, धार्मिक व
सांस्कृतिक कार्यक्रम, वेगवेगळ्या कारणांसाठी होणारे स्टेज शो अशा विविध कारणांमुळे
ध्वनिप्रदूषणाची समस्या वाढत आहे. या समस्येवर नियंत्रण --59.94.1.10 ०८:१६, २२ जानेवारी २०१४ (IST) करण्यासाठी हे नियम बनविण्यात आले.
यामधील नियम ५ व ६ आणि पर्यावरण
संरक्षण अधिनियम, १९८६मधील कलम १५ अन्वये ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेचे उल्लंघन केले
जात असेल तर त्यासाठी पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. फौजदारी प्रक्रिया
संहितेतील तरतुदीप्रमाणे ध्वनिप्रदूषणाचा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्रही आहे.
ध्वनिप्रदूषणाच्या
नियंत्रणासाठी काही उपाय
मुंबईतील वाढते ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उड्डाणपूल व
इलिव्हेटेड रोडवर आवाज प्रतिबंधके लावली गेली आहेत. पुलांच्या कठड्यांभोवती
फायबरचे सात फूट उंचीचे अडथळे उभारले की आवाजाची तीव्रता कमी होते. इमारत व
उड्डाणपूल यांच्यातले अंतर ३० मीटरपेक्षा कमी असेल तर फ्लायओव्हरच्या दोन्ही
बाजूला सात फूट उंचीची आवाज प्रतिबंधके उभारली जातात.
·
भारतात सर्वोच्च
न्यायालयाने कानठळ्या बसविणाऱ्या १२५ डेसिबल्सपेक्षा मोठा आवाज करणाऱ्या
फटाक्यांवर बंदी घातली आहे.
मृदा प्रदुषण
माती प्रदूषण हा महत्त्वाचा विषय आहे. यावर आपण सर्वांनी मिळून हा
प्रश्न सोडवला पाहिजे. औद्यागिक सांडपाणी प्रक्रिया न करता आहे तसे जमिनीमध्ये
सोडले जाते त्यामुळे माती प्रदूषण खूप मोठ्या प्रमानामध्येहोते. तसेच शेतीमधील
रासायनिक खतांचा अतिवापर व कचरा जाळल्यानेही माती प्रदूषण होते. जंगलतोडीमुळे
झाडांची संख्या कमी होते त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते हे हि माती
प्रदूषण होण्याचे कारण आहे. प्रदूषण स्त्रोत शोधून त्याची निर्मुलन केले पाहिजे.
त्यामुळे जमिनीखाली असलेले प्राणी मरतात.
जमिनीचा अपव्यय-
जमिनीवर नैसर्गिक घटक व सांस्कृतिक
घटक त्यात इमारती, रस्ते, वस्त्या, उद्योगधंदे, धरण प्रकल्प इ. आढळतात. हवा पाणी यांच्याप्रमाणे जमीन हा उपयुक्त व
महत्वाचा घटक आहे. पृथ्वी वरील जमिनीचा उपयोग, वापर विविध कारणासाठी केला जातो.
त्यात वसाहती, शेती, वनस्पती , खाणकाम, उद्योगधंदे, जलसाठे इ. प्रमुख वापराची, उपयोगाची कारणे आहेत.
निसर्गातील जमीन/मृदा हा घटकही वाढते
शहरीकरण, वाढती कारखानदारी,
वाढती लोकसंख्या यांच्यामुळे टाकाऊ
विषारी पदार्थाची विल्हेवाट लावता येत नाही. त्यामुळे जमीन प्रदूषित होते. त्यातून
जमीन अपुरी पडते व त्यामुळे भूमीप्रदूषण समस्या निर्माण होतात. व त्यामुळे मृदेचा
गैरवापर केला जातो.
मृदा / भूप्रदूषनाची कारणे
1. रासायनिक खते व कीटनाशके यांचा अतिरेकी वापर-
जमिनीत जास्तीत जास्त रासायनिक घटक हे रासायनिक उद्योगांप्रमाणे
शेतीसाठी वापरले जातात. जास्त उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी हा रासायनिक खते, कीटकणाशके व इतर
टाकाऊ पदार्थ जमिनीत मिसळतो त्यामुळे जमिनीचा कस कमी होतो. ती नापीक बनते तसेच
जमिनीत शेतीसाठी उपयुक्त असलेल्या सूक्ष्म जीवजंतूंचा नाश होतो. कीटकणाशके ही
जमिनीवरून पाण्यात प्रवेश करतात. शेतीतील पिकांमध्ये मिसळतात त्यामुळे शेतीच्या
उत्पादनातही रासायनिक अंश मिसळतात. अन्नाद्वारे ते मानवी शरीरात प्रवेश करतात.
म्हणजेच शेतीतील रासायनिक द्रव्य पिकांमध्ये उतरतात. कोणत्याही पिकच्या वाढीसाठी
नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम हे तीन महत्वाचे आहे. जगात सर्वच देशांमध्ये
रासायनिक खतांचा वापर जास्त केला जातो.
कोणत्याही पिकांच्या वाढीसाठी
रासायनिक खतांचा वापर जास्त केला जातो. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मृदा नापीक
होते. मातीतील पिकांना आवश्यक उपयुक्त जीवजंतु मरून जातात. शेतीतील पिकांना पाणी
देताना पिकांसाठी वापरलेली विषारी रासायनिक द्रव्य पावसाच्या पाण्यात मिसळून उतरणे
वाहून जातात. व नद्या ओढे, तलाव यांना जाऊन मिळतात त्यामुळे पाणी प्रदूषित होते. भारतात ऊसाच्या
पिकाला अती पाणी व अतीरसायनिक खते
वापरल्याने त्या जमिनी नापीक व चोपड बनत
चालल्या आहे. कीटकनाशकातील टाकाऊ घटकांमध्ये हायड्रोजन सल्फाइड व सल्फरडाय ऑक्साईड
हे वायु तयार होऊन जमिनीतून दुर्गंधी येते.
२ . शेतीतील सिंचन व मशागत पद्धती :
शेतीतील पिकांना विशेषतः नगदी, बागायती, व्यापारी पिकांना
अवशक्ते पेक्षा जास्त पाणी दिल्याने अतिजलसिंचनाणे पाणी शेतात तुडुंब साचते.
जमिनीच्या खालच्या थरातील क्षार हे वरच्या थरात केशाकर्षण पद्धतीने जमा होतात व
मृदेचा वरचा थर खारट, नापीक व कडक बनतो. जास्त पाणी दिल्याने पीक चांगले येत नाही.
पिकाला आवश्यक तेवढेच पाणी दिले
पाहिजे. परंतु बहुसंख्य शेतकरी पाण्याचा अतीवापर करतात. उन्हाणे तापलेल्या जमीनिना
भेगा, तडे पडतात. शेतातील मशागतीत नांगरणी, कुळ्वणी, पेरणी, खुरपणी इ.
प्रक्रिया केल्या जातात. हे काम शेतजमिनीच्या मगदुराला अनुसरून केले तर पावसाच्या
पाण्याबरोबर मातीतील सुपीक द्रव्य उतरणे वाहून जातात व माती नापीक बनते. जमिनीत
सलग तीच ती पिके घेतल्याने माती नापीक बनते. शेतकर्यांचे या बाबतीत साक्षरतेचे
प्रमाण कमी असल्यामुळे तसेच जुनाट पददतीने शेती केल्यानेही मातीची सुपीकता घटते.
पाणी, खते किती द्यावेत बियाणे चांगले कोणते वापरावे, इ. शास्रीय माहिती
शेतकर्याला असणे गरजेचे आहे.
मृदा प्रदूषणाचे परिणाम -
1) औद्योगिकीकरणाचे दुष्परिणाम :उद्योगधंद्यातील टाकाऊ पदार्थ, कचरा व वापरत आणलेल्या रसायनिक टाकाऊ
घटकांच्या मिश्रणातून माती नापीक होते. शिवाय हवा पाण्याच्या व मृदेच्या
प्रदूषनामुळे रोगांच्या साथी पसरतात हानिकारक किरणोस्तारी पदार्थ हे जलचर व
जमीनीवरील वनस्पति, पिके यांच्या उत्पादनाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतात. त्यात
कार्बन, लोह, कोबाल्ट, झिंक इ. समावेश होऊन रोग पसरतात व मृत्यू होतो.
2) वनस्पती/ जंगलतोडीचे परिणाम :जगात सर्वत्र कारखाने, वस्त्या, विविध
प्रकल्पांच्या विकासासाठी शेतजमीनिवर व जंगल क्षेत्रावर आक्रमण झाले. व शेती
क्षेत्र व जंगलक्षेत्र घटले. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरू शकत नाही. जंगले
घटल्याने भुपृष्टावरील हवामानात बदल होतो व तापमान वाढते. जमिनी ओसाड पडतात. असहय
उष्णतेने अनेक जीव बळी जातात. जमीन कोरडी नापीक होते. प्राणवायू व कार्बन डाय
ओक्साइड यांचा समतोल ढासळतो. उताराच्या जमिनीवर जास्त पावसामुळे धूप होते.
मृदा प्रदुषणावरील उपाय -
1)
जलसंचयन व वनस्पति
व जंगल क्षेत्रात वाढ करणे आवश्यक :जमिनीची धूप
थांबवण्यासाठी योग्य पद्धतीने ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ योजना आखाव्यात. ताली बांधणे, बांध घालणे, बंधारे धरणे बांधणे, पाझर तलाव बांधणे व
उताराला आडव्या दिशेने ताली घालणे, त्या त्या हवामानात वाढणार्या
वनस्पतींची भरपूर प्रमाणात लागवड करने आवश्यक आहे.
पावसाचे पाणी जमिनीत मरावे म्हणून
जमिनीवर वृक्षांची लागवड करावी. कोणत्याही ठिकाणी, गावात जिल्ह्यात, राज्यात सर्वत्र
एकूण क्षेत्रफळाच्या 33% क्षेत्र जंगलाखाली असावे, असा पर्यावरणाचा नियम आहे. कारण
त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. पिकांना, वनस्पतींना गरजेपुरताच पाणी पुरवठा
करावा. ठिबक सिंचनाणे 90% पाण्याची बचत होते, त्याला उत्तेजन द्यावे.
2) शेतीची योग्य मशागत पद्धती व शेती
सिंचन :पिकांना त्यांच्या गरजे पुरतेच पाणी द्यावे पिकांच्या पाणी
पुरवठ्याचे योग्य नियोजन करावे. शेतीला अतिरिक्त पाणी देऊन ते वाया घालऊ नये, पिकांचे नुकसान करू
नये. शेतीतील पिके आलटून पालटून घेताना कस, मातीची सुपीकता वाढेल अशी पिके
घ्यावीत. शेतीची मशागत उतारच्या दिशेने करू नये. नांगरणी, पेरणी आडव्या दिशेत
करावी. शेतात सलग एकाच एक पीक घेऊ नये. मशागत आडव्या दिशेने करावी. जमिनीवर
गवतांचे व वनस्पतीचे आच्छादन वाढवावे. मृदा सुपीक, निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त
शेणखत, नैसर्गिक खत वापरावे.
अशा प्रकारे प्रदुषण थांबवण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने
प्रयत्न केला पाहिजे तरच आपला देश प्रगती करू शकतो .
@ धन्यवाद @
Kaddak
ReplyDeleteThanks 😊
ReplyDeleteTh oven harm extra
ReplyDeleteFyhiof6 fy9vvji
ReplyDeleteThanks 🙏
ReplyDeleteThanks you so very much🙏
ReplyDeletethank you
ReplyDeleteNirikhan send Kara plz
ReplyDeleteBest project
DeleteKadddddddak bhai
DeleteThanks
ReplyDeleteThanks🙏🙏🙏🙏
ReplyDeleteThanks 🙏🙏
ReplyDeleteKadak
ReplyDeleteThanks
ReplyDeleteThank you so mach🤗🤗
ReplyDeleteThank you so much 😍🤩🙏
ReplyDeleteThanks
ReplyDeleteNice
ReplyDeleteKadakk
ReplyDeleteBest
ReplyDeleteTq ..nice
ReplyDeleteThanks
ReplyDeleteThis information he has first copied from wikipedia and pasted on his project.
ReplyDeleteThanks 😊😊😊
ReplyDeleteBakwas maja nahi aaya
ReplyDeleteThen why are u saw this site
DeleteBloody man
Thanks
ReplyDeleteThank you 😊
ReplyDeleteHarrah's Resort Atlantic City - Mapyro
ReplyDeleteFind Harrah's Resort Atlantic City, New 김포 출장안마 Jersey, United 성남 출장샵 States, real-time prices, reviews, photos and 보령 출장마사지 more - with real-time 울산광역 출장마사지 ratings and the 전주 출장안마